आळेफाटा बाजारात कांदा २१० रुपये प्रतिदहा किलो

आळेफाटा बाजारात कांदा २१० रुपये प्रतिदहा किलो

आळेफाटा, ता.१५ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (ता. १४) कांद्याच्या २८ हजार ९७६ पिशवींची आवक झाली. बाजारात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोला २१० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
बाजारातील मोढ्यांत एक नंबर कांद्यास दहाकिलोस १९० ते २१०, दोन नंबर कांद्यास १७० ते १९०, तीन नंबर गोल्टी १२० ते १६० तर चार नंबर बदला,चिंगळी कांद्यास ५० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.
कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या बाजारभावामधून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. इंधनाचे भरमसाठ वाढलेले दर, मजुरी, मशागत या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रासायनिक खते तसेच औषधाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com