

आळेफाटा, ता.२१ : ‘‘खरीप पूर्व नियोजनामध्ये सोयाबीनचे वाढते क्षेत्र बघता बियाणांचा तुटवडा होऊ नये म्हणून घरगुती बियाणे वापरावे व त्यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी घ्यावी. बियाणे पेरतात त्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी शेतामध्ये बियाणे पेरताना बीबीएफ यंत्राचा वापर करावा,’’ असे आवाहन मंडल कृषी अधिकारी राजश्री नरवडे यांनी केली आहे
वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील शिवाजी डोके यांच्या शेतावर कृषी विभागातर्फे बीजप्रक्रिया मोहीम राबवून नरवडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर दर वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खरिपातील सोयाबीन या बियाण्याची उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया या मोहिमा राबविल्या जातात.
बेल्हे मंडल कार्यालयाअंतर्गत एकूण ३५ गावे असून, यामध्ये अंदाजे ४८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असून, त्यासाठी २६४० क्विंटल बियाणे बियाणांची गरज असून सध्या शेतकऱ्यांकडे ३२०० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे
यावेळी नरवडे यांनी सांगितले की, बिजप्रक्रियेतील ८५ बियाणे उगवून आले तर ८५ टक्के बियाणांची उगवण क्षमता आहे. एकरी बीबीएफ यंत्राने पेरणी केली तर २२ किलो बियाणे लागते. त्यानुसार पेरणी करावी. तसेच पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करताना एफआयआर पद्धतीनें करावी म्हणजे बियाणे रोगमुक्त राहते व पीक जोमदार येते.
या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी वैभव विश्वे, कृषी पर्यवेक्षक शिवकांत कोल्हे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.
04639
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.