आळेफाटा येथे ३४१ संकरीत गायींची विक्री

आळेफाटा येथे ३४१ संकरीत गायींची विक्री

आळेफाटा, ता.२३ : आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२३) गाईंचा बाजार भरला होता. बाजारात ३४१ संकरित गाया विक्रीसाठी आल्या होत्या. यामध्ये २७३ गायींची विक्री होऊन १० हजारांपासून ८१ हजार रुपयापर्यंत विक्री झाली.
दर गुरुवारी भरत असलेला गाईंचा बाजारात पुण्यासह पारनेर, अकोले, नाशिक, संगमनेर, ठाणे, नगर, अकोले, राजगुरुनगर तसेच इतर ठिकाणाहून संकरित दुधाळ जातीच्या गाया विक्री साठी येत असतात, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक, धोंडिभाऊ पिंगट, सचीव रूपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली.
दरम्यान, सध्या कडक असा उन्हाळा सुरू असून, जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध नसला तरी काही दिवसांवर पावसाळा सुरू होणार आहे. जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध होणार आहे त्यामुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांकडून गायींच्या खरेदी-विक्रीस या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती रूपेश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, संतोष कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, दिलीप सरमाळे, विजय थोरात, अमोल मोडवे सिकंदर शेख, नन्नू शेख, रोहिदास निमसे, जब्बार शेख, जब्बार पठाण या व्यापाऱ्यांनी सांगितले.


04652

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com