पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी टोलची दरवाढ

पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी टोलची दरवाढ

आळेफाटा, ता. ४ : राज्य महामार्ग क्रमांक ५० हा पुणे व नाशिक या दोन प्रमुख प्रमुख शहरांना जोडणारा महामार्ग असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात छोट्या वाहनांपासून अगदी अवजड वाहने या महामार्गावर धावतात. त्यामुळे प्रचंड वर्दळीचा असणाऱ्या या मार्गावर सोमवार (ता. ३) पासून टोल दरवाढ झाल्याने वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

नव्या दराने टोल वसुली केली जाणार असल्यामुळे वाहन चालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या टोल नाक्यावर मोटार, जीप आणि हलक्या वाहनांना पूर्वी १०५ रुपये टोल आकारला जात होता. त्यामध्ये पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तीन तारखेपासून ११० रुपये तर दुहेरी वाहतुकीसाठी १६५ रुपये टोलसाठी मोजावे लागत आहेत. हलक्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनास १७५ रुपये तर दुहेरी वाहतुकीसाठी २६५ रुपये तर ट्रक व बस या ३७० रुपये तर दुहेरी वाहतुकीसाठी ५५५ रुपये मोजावे लागत आहेत. बांधकाम करणारे किंवा खोदकाम करणाऱ्या वाहनांसाठी ५८० रुपये तर अवजड वाहनांसाठी आता ७०५ रुपये टोल भरावा लागत आहे. स्थानिक खासगी वाहनांसाठी ३४० रुपयांचा मासिक पास देण्यात येणार असल्याची माहिती चाळकवाडी टोल कलेक्शन एजन्सी प्रतिनिधी सागर पवार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com