आळेफाटा बाजार समितीत कांद्याच्या ८ हजार पिशव्यांची आवक

आळेफाटा बाजार समितीत कांद्याच्या ८ हजार पिशव्यांची आवक

आळेफाटा, ता.११ : आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी (ता. ११) कांद्याच्या ८ हजार ९३० पिशवीची आवक झाली असून चांगल्या प्रतीचा गोळा कांद्यास दहा किलोला ३२२ रुपये बाजारभाव मिळाला आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, नबाजी गाडगे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयांत एक नंबर कांद्यास दहा किलोस २८० ते ३०० रुपये बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांद्यास २५० ते २८० बाजारभाव मिळाला‌‌.तीन नंबर गोल्टी कांद्यास २२० ते २५० रुपये बाजारभाव मिळाला तर चार नंबर बदला गोल्टी कांद्यास दहा किलोस १०० ते २०० बाजारभाव मिळाला.
दरम्यान येथील बाजार समितीत रविवारी बाजारभाव उतरला होता तो मंगळवारी (ता. ११) झालेल्या मोंढयात बाजारभावात किलोमागे ३ ते ५ रुपयांनी भाव वाढ झाली असल्याची माहिती संतोष कुऱ्हाडे,विजय कुऱ्हाडे, अनिल गडगे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे, संदीप कोरडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com