उंचखडक येथे 
४५ झाडांचे रोपण

उंचखडक येथे ४५ झाडांचे रोपण

Published on

आळेफाटा, ता. ३ ः उंचखडक (ता.जुन्नर) येथील सह्याद्री सोशल फाउंडेशन व सह्याद्री गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मित्रांच्या वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून गावात वृक्षारोपण केले.

काही जणांनी आपल्या दिवंगत व्यक्तीच्या स्मरणार्थ तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने झाडे देण्याचे ठरविले. तसेच भैरवनाथ दूध उत्पादक संस्था मर्या उंचखडक संपूर्ण गवळी बांधवांनी सुद्धा अतिशय मोलाचे आर्थिक सहकार्य केले. त्यानुसार शरद कणसे, राजेश कणसे, नीलेश कणसे, वैभव कणसे, आकाश कणसे, ओम कणसे, आर्यन कणसे, आविष्कार शिंदे, संचित कणसे, अक्षय कणसे, समीर कणसे आदींनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्यातून साधारणपणे ५५ हजार रुपयांची झाडे, लोणावळा, कामशेत येथील नर्सरीमधून मागवली. यामध्ये वडाची ३३, पिंपळाची सात, गुलमोहर पाच अशी एकूण ४५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण करण्यासाठी झाडांची खरेदी किंमत आणि लावण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली हा सर्व खर्च मिळून ६१ हजार रुपये आला, अशी माहिती सह्याद्री सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.