रस्त्यालगत झोपलेल्याचा 
मोटारीखाली सापडून मृत्यू

रस्त्यालगत झोपलेल्याचा मोटारीखाली सापडून मृत्यू

Published on

आळेफाटा, ता. ३ : मोटार मागे घेत असताना रस्त्यालगत झोपलेल्या तरुणाचा मोटारीखाली सापडल्याने मृत्यू झाला.
पुणे-नाशिक महामार्गावरील आळे (ता. जुन्नर) येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
एक अनोळखी पस्तीस वर्षीय तरुण पुणे- नाशिक महामार्गावर श्री सेवाश्रम उपहारगृहाजवळ रस्त्यालगत झोपलेला होता. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आळे येथील इम्रान लतीफ मणियार हे त्यांची क्रमांक नसलेली ब्रिझा मोटार मागे घेत होते. त्यावेळी झोपलेला तरुण मोटारीखाली सापडला. त्यात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर इम्राम मणियार पसार झाल्याची फिर्याद ज्ञानेश्वर भिवसेन नेहरकर यांनी दिली. त्यानुसार आळेफाटा पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.