बिबट्याच्या हल्ल्यात 
राजुरी येथे वासरू ठार

बिबट्याच्या हल्ल्यात राजुरी येथे वासरू ठार

Published on

आळेफाटा, ता. ४ : राजुरी (ता. जुन्नर) येथील आडेवहाळ मळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले.
राजुरी येथील आडेवहाळ मळ्यात राहात असलेले आशिष शिवाजी हाडवळे यांचा गाईंच्या गोठ्यात बांधलेल्या धाब्यावर गुरुवारी (ता. ४) पहाटे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी हाडवळे यांना गाईचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे ते गोठ्याजवळ गेले असता त्यांना बिबट्या एका वासरावर हल्ला करताना दिसला. त्यामुळे हाडवळे यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. परंतु, या हल्ल्यात वासरू ठार झाले. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी त्रिंबक जगताप, स्वप्नील हाडवळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

घरावर रात्रभर बिबट्याचा ठिय्या
आडेवहाळ मळ्याजवळ असलेल्या उंचखडक या ठिकाणी येथील पाटीलबुवा तबाजी कणसे यांच्या घरावर रात्रभर ठिय्या मांडून राहिला होता. कणसे यांच्या घरामध्ये मुलगा अनिल व सून सविता हे होते. त्यांना बिबट्या घरावर असल्याचा आवाज आला. त्यामुळे पाटीलबुवा हे हातात काठी घेऊन घराबाहेर आले. त्यावेळी त्यांना घरावर बिबट्या बसलेला दिसला. त्यामुळे ते घाबरले व घरात जाऊन दरवाजा बंद करून बसले. त्यांना रात्रभर बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता. त्यांच्या घराशेजारी बंधू सीताराम तबाजी कणसे यांचा गोठा आहे. त्यामध्ये शेळ्या व गाई बांधलेल्या होत्या. शिकार मिळेल या आशेने बिबट्या त्यांच्या घरावर बसून होता, परंतु गोठा बंदिस्त असल्यामुळे बिबट्याला शिकार मिळाली नाही. अखेर बिबट्या कंटाळून पहाटे चारच्या सुमारास जवळच असलेल्या उसाच्या शेतात निघून गेला. त्यानंतर कणसे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, या परिसरात बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.