जुन्नरमधील १५ वर्षाखालील मुलींवर लसीकरण

जुन्नरमधील १५ वर्षाखालील मुलींवर लसीकरण

Published on

आळेफाटा, ता. ६ : जुन्नर तालुक्यातील १५ वर्षीच्या खालील मुलींवर मोफत लसीकरण करणार असल्याचे प्रतिपादन डॉ.अमोल डुंबरे यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे केले.

रोटरी क्लब ऑफ आळेफाटा- मेन यांच्यावतीने ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने व्यवसायाच्या माध्यमातून समाजाची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मानप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रोटरीचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, प्रा.शिवाजी गोरे, सेक्रेटरी ॲड. जयवंत सोनवणे, संपत रहाणे, सुधीर नरवडे, डॉ. प्रदीप गुंजाळ, डॉ. सुयश प्रदीप गुंजाळ, मोहन जाधव, संदीप वाघोले, शुभम ढमाले, गणेश मेहेर आदी रोटरियन उपस्थित होते. ‘डॉक्टर्स डे’ निमित्त साधून क्लबने डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच रोटेरियन डॉ. शिवाजी सोनवणे यांनी हाडांच्या सांध्यांचे ऑपरेशन करून पुनर्रोपण अल्प फी मध्ये करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.