कांद्याच्या १२ हजार पिशव्यांची आवक

कांद्याच्या १२ हजार पिशव्यांची आवक

Published on

आळेफाटा, ता.६ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात शुक्रवार (ता. ५) कांद्याच्या १२ हजार ९०६ पिशवींची आवक झाली. बाजारात चांगल्या प्रतिचा गोळा कांद्यास दहा किलोला ३५१ रुपये बाजारभाव मिळाला आहे.

बाजारातील मोढ्यांत एक नंबर कांद्यास दहा किलोस ३०० ते ३२१, दोन नंबरला २८० ते ३००, तीन नंबर गोल्टी कांद्यास २३० ते २६०, चारनंबर बदला गोल्टी कांद्यास १३५ ते २३५ बाजारभाव मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रितम काळे, नबाजी गाडगे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.

दरम्यान, येथील बाजार समितीत शुक्रवारी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन सुध्दा झालेल्या बाजारभावात किलोमागे ४ ते ५ रुपयांनी बाजारभावात वाढ झालेली असल्याची माहिती संतोष कुऱ्हाडे, विजय कुऱ्हाडे, अनिल गडगे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे, संदीप कोरडे यांनी दिली.

04886

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.