राजुरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राजुरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Published on

आळेफाटा, ता. ९ : शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा हा करिअर घडविण्याचा राजमार्ग असून त्यासाठी सातत्याने परिश्रम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन हर्षल आग्रे यांनी राजुरी या ठिकाणी केले.

राजुरी (ता. जुन्नर) येथील जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ साथ फाउंडेशन वतीने घेण्यात आला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील पवार, विकास गोसावी, राजकुमार औटी, विकास घंगाळे, गणेश बनकर, इम्रान चौगुले आदी उपस्थित होते. तसेच, यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आग्रे म्हणाले, मोबाईल हे व्यसन असून त्यापासून दूर रहाणे गरजेचे आहे तसेच मुलांनी वर्तमान पत्रे दररोज वाचावीत व शक्यतो पालकांनी आपल्या घरी एक तरी वर्तमानपत्र आणावा असे सांगितले.

साथ फाउंडेशनच्यावतीने दत्तक पालक योजना अनेक वर्षापासून सुरू केली असून गरजू, होतकरू अशा तेरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असून इथून पुढील सर्व शैक्षणिक खर्च करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक राहिंज यांनी केले. आभार संतोष गोपाळे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.