राजुरी येथे लांब पल्ल्यांच्या
एसटी नसल्यामुळे हाल

राजुरी येथे लांब पल्ल्यांच्या एसटी नसल्यामुळे हाल

Published on

आळेफाटा, ता. ११ ः राजुरी येथील बस स्थानकावर लांब पल्ल्यांच्या एसटी थांबत नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे

राजुरी( ता.जुन्नर) येथील बस स्थानकावर लांब पल्ल्याच्या कुठल्याही एसटी थांबत नव्हत्या. यामुळे येथील प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. कारण येथील गावची लोकसंख्या सुमारे सतरा हजारांहून अधिक आहे. त्यामुळे साहजिकच येथील बस स्थानकावर नेहमीच गर्दी असते. तसेच राजुरी याठिकाणी समर्थ कॉलेज व सह्याद्री कॉलेज ही दोन महाविद्यालये तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पराशर कृषी पर्यटन केंद्र असल्याने या गावात बाहेर गावाहून अनेक पर्यटक या ठिकाणी दररोज येतात. परंतु, या ठिकाणी पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, पार्थडी या डेपोच्या तसेच कल्याण, ठाणे, मुंबई, या
डेपोच्या एसटी याठिकाणी थांबत नव्हत्या. त्यामुळे येथील ग्रामस्थांना आळेफाटापर्यंत तसेच बेल्हा या ठिकाणांपर्यंत खासगी वाहनाने जादा पैसे देऊन जावे लागत होते. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे राजुरी येथील तसेच उंचखडक व जाधववाडी येथील ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच प्रिया हाडवळे व उपसरपंच माऊली शेळके यांच्या वतीने व येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने या ठिकाणी सर्व बसेस थांबवाव्यात, अशी मागणी केली आहे.

कल्याण या ठिकाणाहून एसटी मध्ये बसल्यानंतर राजुरी या ठिकाणी उतरायचे असेल, तर पुढील बेल्हे गावाचे तिकीट फाडावे लागते. एसटी ही राजुरी येथील एसटी स्थानकावर न थांबता ती पुढे काही अंतरावर जाऊन थांबते. हा प्रकार थांबवावेत अशी मागणी देखील होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.