शिरोली सुलतानपूर स्कूलमध्ये 
विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान

शिरोली सुलतानपूर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान

Published on

आळेफाटा, ता. ५ : लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरोली सुलतानपूर बोरी (ता. जुन्नर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सरपंच प्रिया खिलारी, उपसरपंच दत्तात्रेय डावखर, मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे, शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष सुभाष खिलारी, माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजू पोळ, अजित खिलारी तंटामुक्तीचे अध्यक्ष महेंद्र खिलारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविला. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यादृष्टीने अनेक वर्षांपासून विद्यालयाच्या पाठीमागे व रस्त्यापलीकडील कचऱ्याच्या खचाखच भरलेल्या चार कुंड्या जेसीबीच्या साहाय्याने इतरत्र हलविण्यात आल्या. तसेच विद्यालयाच्या परिसरातील गवत काढून तेथे कीटकनाशक फवारणी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बोऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com