‘गोमाता’च्यावतीने सभासदांना १२ टक्के लाभांश

‘गोमाता’च्यावतीने सभासदांना १२ टक्के लाभांश
Published on

आळेफाटा, ता. २२ : गोमाता सहकारी दूध उत्पादक संस्था आळेफाटा दूध उत्पादकांना १२ टक्के लाभांश व दिवाळी वाटप करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा वडगाव आनंद परिसरातील गोमाता सहकारी दूध उत्पादक संस्थेने दूध उत्पादकांना २०२३-२४ या आर्थिक वर्षात संस्थेस पुरवठा केलेल्या दुधावर प्रति लिटर तीन रुपये दूध दर फरक (३०,५१,३३३) तीस लाख एक्कावन्न हजार तीनशे तेहतीस रुपयांचे वाटप करण्याचे ठरले असून संस्थेच्या सर्व सभासदांना दीपावली भेटवस्तू व १२ टक्के प्रमाणे लाभांश वाटप केले.
यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते भेटवस्तू वाटप शुभारंभ केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश वाघमारे, उपाध्यक्ष गणेश देवकर, सुरेश गडगे, विलास गडगे, संदीप गडगे, गोपाळ फुलसुंदर, रेश्मा चौगुले, सविता शिंदे, दीपक गडगे, अभिषेक कोकाटे, रामदास वाळुंज, शिवाजी शिंदे, शिवाजी गडगे, ज्ञानेश्वर वाघमारे, दत्तात्रेय गडगे, विजया दिवेकर आदी मान्यवर दूध गवळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com