बदल्या हवामानाचा कांदा पिकास फटका

बदल्या हवामानाचा कांदा पिकास फटका

Published on

आळेफाटा, ता.१९ : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ हवामानाचा फटका कांदा पिकास बसत आहे. यामुळे फवारणीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे कांद्यावर अळी, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे. फवारणीच्या खर्चासह मशागतीच्या खर्चही कमालीची वाढ झालेली आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
आळे, राजुरी, बोरी, साळवाडी, जाधववाडी, भोरवाडी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली गेलेली आहे. निसर्गाच्या या लहरी हवामानामुळे कांदा पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शेतकऱ्यांना या हवामानामुळे फवारणीच्या खर्चात वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या वर्षी कांदा बियाण्यांचा तुटवडा जाणवल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच रोपे तयार केली होती. यासाठीही यंदा भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कांद्याचे बाजारभावात चढ उतार होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून वाढ झाली आहे.

ढगाळ हवामानामुळे कांद्यावर मावा, तुडतुडे व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. औषध फवारणी मळे भांडवली खर्चात वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला असून बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे.
- शंकर कणसे, शेतकरी

गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात ढगाळ हवामान तयार होत आहे. यामुळे कांदा पिकावर मावा, तुडतुडे, लाल कोळीचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने शेतकऱ्यांनी ताबडतोब औषध फवारणी करणे गरजेचे आहे. बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी केल्यास होणारे कांदा पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येईल.
- मुकेश महाजन, कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com