आळेफाटा येथील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये प्रदर्शन

आळेफाटा येथील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये प्रदर्शन

Published on

आळेफाटा, ता. १८ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील अनंतराव कणसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या माध्यमातून महाविद्यालयातील फार्मसी विभागामार्फत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर अनेक प्रतिकृती आणि त्यांचे सादरीकरण केले. फार्मसी विभाग प्रमुख डॉक्टर श्‍वेता डहाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनास संस्थेचे संस्थापक डॉ. चंद्रकांत कणसे, अध्यक्ष डॉ. सरस्वती कणसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कमलेश घोलप यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृती आणि सादरीकरणाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनास मातोश्री आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कर्जुले हरिया येथील विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com