ओळख पटविण्यासाठी शेतकरी कार्ड काढून घ्या
आळेफाटा, ता.१६ : शेतकरी असल्याची ओळख पटविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात. वारंवार होणारा हा त्रास टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी कार्ड
काढून घ्यावे, असे तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांनी केले आहे.
राजुरी (ता.जुन्नर) हे गाव तालुक्यात मोठे महसुली गाव असून या गावामध्ये सत्तावीशे तीस महसुली खातेदार आहेत. येथील तलाठी कार्यालयात किसान कार्ड ओळखपत्र बनवण्याचे शिबिर भरविण्यात आले आहेत. यावेळी शेळके यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपापल्या गावात शिबिर भरवून सर्व शेतकऱ्यांचे कार्ड काढून घ्यावे तसेच तालुक्यात आतापर्यंत ३७२३१ शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढून घेतले आहे. तर एकट्या राजुरी गावात तलाठी आतापर्यंत १५०० शेतकऱ्यांचे शेतकरी कार्ड काढण्यात आले असून जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यात नंबर एकवर आहे.
या प्रसंगी माजी सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, तलाठी धनाजीराव भोसले, ग्रामविकास अधिकारी संदीप ढोरे, संपत हाडवळे, स्वप्नील औटी, सतीष हाडवळे, सचिन औटी, गणेश हाडवळे, स्वप्नील हाडवळे, सिद्धेश कणसे, फिजा चौगुले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

