बोरी बुद्रुकला पाणंद रस्त्याचे उद्‌घाटन

बोरी बुद्रुकला पाणंद रस्त्याचे उद्‌घाटन

Published on

आळेफाटा, ता.१२ : ‘‘बोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांनी मोजणी नंतरही स्वतःहून इतर शेतकऱ्यांची अडचण समजून घेत रस्ते मोकळे केले. ही प्रशासनाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. स्मार्ट व्हिलेज अंतर्गत होणारे रस्ते तालुक्यासाठी पथदर्शक ठरणार आहे,’’ असे प्रतिपादन जुन्नर तालुक्याचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी बोरी बुद्रुक या ठिकाणी केले.

स्मार्ट व्हिलेज मोजणी प्रकल्प तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शीव, पाणंद रस्ते या बाबतच्या शासकीय निर्णयानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) गावातील पाणंद, शीव रस्त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी समिती अध्यक्ष रंजन नाना जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज कोरडे, लक्ष्मण कोरडे, वामन कोरडे, राऊजीबाबा कोरडे, विश्वनाथ थोरात, तुळशीराम जाधव, बाळासाहेब कोरडे, दिलीप कुटे, अमोल खिल्लारी, राजेंद्र जाधव, राजेंद्र कोरडे, शांताराम कोरडे, माऊली कोरडे, अशोक पाडेकर, दत्तात्रेय जाधव, संतोष औटी, सूरज पाडेकर, रत्नदीप जाधव नीलेश जाधव प्रभाकर कोरडे, भारत कोरडे तलाठी वाळुंज भाऊसाहेब,जावेद मणियार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, बोरी गावातील रस्त्याची मोजणीनंतर हद्द बदलून हे वहिवाटीचे सहा रस्ते खुले करण्यात आले. शेतजमीन मोजणी झाल्यामुळे मोजणी समितीचे अध्यक्ष रंजननाना जाधव यांच्या विशेष सहकार्याने पानंद रस्त्यांसाठी मदत झाली आहे.
06115

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com