आळे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
आळेफाटा, ता. २४ : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूलमधील १९७४-७५च्या इयत्ता अकरावीच्या माजी विद्यार्थी व शिक्षकवृंदाच्या उपस्थित स्नेहमेळावा साजरा केला. तब्बल ५० वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेले होते. तत्कालीन दहावीच्या वर्ग मित्र व मैत्रिणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात मुंबई, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे तसेच इतर ठिकाणी कार्यरत आहेत. या स्नेहमेळाव्यामुळे सोनेरी आयुष्यातील रुपेरी आठवणी जागृत झाल्या. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सर्व तत्कालीन विद्यार्थ्यांना संघटित करून हा स्नेहमेळावा आयोजित केला होता.
बऱ्याच वर्षानंतर जुने वर्गमित्र भेटल्याने गप्पांना, थट्टामस्करीला उधाण आलं होतं. या स्नेहमेळाव्याच्या सुरुवातीला विद्यालयाच्या प्रतापराव कुऱ्हाडे, श्यामला अभ्यंकर, गंगाराम गुंजाळ, ए. के. भुजबळ, वाघोले सर या आजी माजी शिक्षकांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
सध्याच्या धावत्या काळात सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात. अशा परिस्थितीत लहानपणीचे सवंगडी आपल्याला भेटत नाही, मित्रांच्या सुख दुःखाच्या गोष्टी त्यांच्या अडचणी लक्षात येत नाही यासाठी आप आपसांत हितगूज व्हावे, सर्वांमध्ये सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे आणि त्यामधून समाजपयोगी उपक्रम राबवावेत असा या स्नेहमेळाव्याचे उद्देश असल्याचे या बॅचचे माजी विद्यार्थी तसेच ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे विद्यमान संचालक किशोर कुऱ्हाडे यांनी मांडला.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन संभाजी पिंगळे, प्रभाकर दिवेकर, महादेव कुऱ्हाडे, लक्ष्मण गाढवे, सुनंदा वायकर, कुसुम थोरवे, सावित्री देवकर, सरोज भांड, अर्जुन कुऱ्हाडे, नागेश कुऱ्हाडे, भरत वनारसे, छाया क्षिरसागर आदींनी केले होते. याप्रसंगी ५८ माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
या बॅचच्यावतीने आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या कामासाठी देणगी देणार असल्याचे सांगितले. विलास राहिंज यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

