चाळकवाडी टोलनाक्यावर स्थानिकांकडून टोलवसुली
आळेफाटा, ता. ६ ः स्थानिकांना टोल सवलत असतानासुद्धा चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील टोलनाका प्रशासनाकडून टोलवसुली केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर असलेला व जुन्नर तालुक्याच्या हद्दीत असलेल्या चाळकवाडी टोलनाक्यावर छोट्या वाहनांना १२० रुपये टोल आकारला जात होता. १ एप्रिलपासून या टोलमध्ये १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. टोल कापल्यानंतर कुठल्याही प्रकारची पावती दिली जात नाही.
या टोलनाक्यावर स्थानिकांना आधार कार्ड दाखवून टोल सवलत दिली जात होती. दरम्यान टोल वसुलीवरून स्थानिकांबरोबर अनेकदा वादविवाद झाले आहेत. हे वाद टाळण्यासाठी टोल प्रशासनाकडून स्थानिकांना पास पद्धत सुरु करण्यात आली. त्यानंतर टोलनाका प्रशासनाकडून १२०० रुपये व वाहनाची कागदपत्रे घेत एक वर्षासाठी पास दिला जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर ३ हजारांहून अधिक स्थानिकांनी नोंदणी केली. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचा पास देण्यात आला नाही. याउलट तुमच्या फास्टॅगवरुन टोलची रक्कम वसूल केली जात आहे.
याबाबत अनेक स्थानिकांच्या तक्रारी केल्या आहेत. फास्टॅगमधून कापले गेलेले पैसे परत मागण्यासाठी गेले असता ’राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून पैसे घ्या’ अशी टोलवाटोलवी करुन उद्धट उत्तरे दिली जात आहेत. टोल फ्री असतानाही २०० रुपये कसे काय घेतले जातात असा प्रश्न विचारला असता. स्थानिकांसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर बसविण्यासाठी हे पैसे घेतले जात असल्याचे सांगण्यात आले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

