प्लॅस्टिक, थर्मोकोलच्या जमान्यात पत्रावळ्या कालबाह्य
आळेफाटा, ता.७ : पूर्वी लग्न कार्यात व घरगुती तसेच सार्वजनिक कार्यक्रमातील पंगतीसाठी पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोणचा सऱ्हास वापर केला असे. मात्र, आता प्लॅस्टिक व थर्मोकॉलच्या जमान्यात पळसाच्या पानांच्या पत्रावळ्या व द्रोण सध्या कालबाह्य झाले आहेत.
पत्रावळ्यांना विशेष महत्त्व असायचे. पूर्वी हजारो कुटुंब पत्रावळ्याच्या व्यवसायावर जगत होती. पळसाच्या पानांना सुतळीद्वारे गुंफले जात असे. पानांचे देठ कापून पाने एकावर एक एक रचून ठेवली जायची. ही पाने एकमेकांना टोचण्यासाठी पानांचा देठांचा वापर केला जातो. साधारण एक पतरावळी बनवण्यासाठी सात ते आठ पाने वापरली जातात. ती काहीशी ओबडधोबड आकारात असे. अशा काही पत्रावळी तयार झाल्या की, त्यांना एक सारखा गोलाकार देणे आवश्यक असते. त्यासाठी दगडी जात्याचा तळीची मदत घेतली जात होती. पत्रावळीवर ठेवून त्याबाहेर आलेला भाग कात्रीने कापून घेतला जातो.
प्लॅस्टिक बंदीनंतर पत्रावळ्या बनविणाऱ्यांना चांगले दिवस येण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, सध्या प्लॅस्टिक पत्रावळी सहज उपलब्ध असल्यामुळे नागरिक त्या खरेदी करीत आहेत.
पत्रावळ्या जाळून शेताला खत
प्लॅस्टिकच्या तुलनेत पळसाच्या पानांच्या पत्रावळ्यांमुळे प्रदूषण कमी होते. तसेच पत्रावळ्या जाळून शेताला खतही मिळते. पंगती उठल्यानंतर टाकलेल्या पत्रावळ्यावरील अन्नावर काही जनावरे ताव मारत असतात.
पूर्वी पानांच्या पत्रावळी व सामूहिक पंगत रंगत असत. वरण भात व भाजीचा स्वाद द्विगुणित होत असे. परंतु आता पत्रावाळी बरोबरच सामूहिक पंगतीची परंपरा देखील हळूहळू खंडित होऊ लागली आहे. त्यामुळे पत्रावळीतील भोजनाचा स्वाद आणि द्रावणामध्ये कडी पिण्याचा आनंद हरवत चालला आहे.
- सोपान कदम, ज्येष्ठ नागरिक, वडगाव कांदळी (ता.जुन्नर)
प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या वापरून झाल्यानंतर त्याचे विघटन लवकर होत नाही. या पत्रावळ्या जनावरांनी खाल्ल्यास जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते. तसेच या पत्रावळ्यांचा जास्त वापर केल्यास माणसांना कर्करोग व हार्मोन्सचे आजार होण्याची शक्यता असते. जैविक सृष्टीवर प्रदूषणाचा घातक परिणाम होतो. त्यामुळे पळसाच्या पत्रावळ्यांना नागरिकांनी प्राधान्य द्यावे.
- डॉ.दिलीपकुमार ताजवे, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी
06335
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.