आळेफाटा बाजारात नव्या कांद्याची आवक

आळेफाटा बाजारात नव्या कांद्याची आवक
Published on

आळेफाटा, ता.३१ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात शुक्रवारी (ता. ३०) कांद्याची ३४ हजार २६० गोण्यांची आवक झाली. एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस मिळाला १८१ रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढली आहे.
बाजारात सुपर एक नंबर कांद्यास दहा किलोस १३० ते १५०, सुपर मीडियमला ११० ते १३०, तीन नंबरला ९० ते ११०, चिंगळी कांद्यास ३० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला आहे, असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख दीपक म्हस्करे यांनी दिली.
दरम्यान, येथील बाजार समितीत या आठवड्यात चालू हंगामात नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याची माहिती कांदा व्यापारी रामदास शिंदे, तान्हाजी कुऱ्हाडे, संतोष कुऱ्हाडे, अनिल गडगे, ज्ञानेश्वर गाढवे, शिवप्रसाद गोळवा, विजय कुऱ्हाडे, सचिन डावखर, सागर कुऱ्हाडे, चैतन्य कुऱ्हाडे, संतोष गांधी, भळगट मामा,पापा मोमीण,अरीफ पटेल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com