कुकडी नदीलगतच्या शेतात घोणस सापांची भीती

कुकडी नदीलगतच्या शेतात घोणस सापांची भीती

Published on

आळेफाटा, ता. १० : जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील कुकडी नदी कुकडी नदीलगत असणाऱ्या शेतामध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची खरिपाची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, बोरी बुद्रुक, तांबेवाडी, साळवाडी परिसरातील शेतात वारंवार घोणस साप दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मे महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने पाणी सापांच्या बिळात शिरले आहे. यामुळे घोणस जातेचे साप बाहेर पडले आहेत. त्यांनी आळे परिसरातील बहुतांश गावांना विळखा दिल्याचे चित्र आहे. कुकडी नदीच्या काठावर असलेली बोरी बुद्रुक, तांबेवाडी, साळवाडी आदी गावातील शेतकऱ्यांना दररोज दर्शन होताना दिसत आहे.
सर्पदशं झाल्यानंतर जर आपण त्यावर लवकरात लवकर उपचार केले नाहीत तर ते विष पूर्ण शरीरात भिनते व त्यामुळे माणसाचा मृत्यू ही होऊ शकतो. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
घोणस जातीचा साप हा शक्यतो रात्रीचा भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो. शेतात, उजाड माळरानावर, रस्त्यावर या सापाचे दर्शन होत आहे. सध्या कांदा, गहू, ऊस आदी शेतातील पिकांना शेतकरी रात्रीचे पाणी देत असतात. अशा शेतकऱ्यांनी सावध व सतर्कतेने काम करावे. असे आवाहन कुकडी लगत भागातील सर्पमित्र करत आहेत.


सर्प दंशाचे लक्षणे
१ उलटी होणे,चक्कर येणे,थंडी
२. चिकट त्वचा.
३ दंश झालेली जागा काळी -निळी पडते.

घोणस साप कसा ओळखावा?
घोणस सापाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात.

साप चावल्यानंतर प्रथम त्या व्यक्तीला डॉक्टरकडे घेऊन जावे. चावलेला साप कोणता आहे याची माहिती मिळवावी. शक्य असेल तर त्याचा फोटो काढून डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. साप चावल्यानंतर रुग्णाला मांत्रिक घेऊन जाऊ नये. साप चावल्यानंतर ज्या ठिकाणी दंश केला असेल त्याच्या वरती दोरी किंवा कापड घट्ट बांधावे जेणेकरून सर्पदंशाचे विष शरीरामध्ये पसरणार नाही.
- डॉ.मनोज वेठेकर

21560

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com