राजुरीतील शेतकरी ऊस लागवडीत व्यग्र

राजुरीतील शेतकरी ऊस लागवडीत व्यग्र

Published on

आळेफाटा, ता.९ : राजुरी, वडगाव आनंद, आळे, बोरी, जाधववाडी, गुंजाळवाडी या गावांमधील शेतकरी ऊस लागवडीत व्यग्र आहेत. यंदा शेतकरी आधुनिक पद्धतीने उसाची लागवडी करणाऱ्यावर दिली आहे.
जुन्नरमध्ये केळी, द्राक्षे ही बारमाही पिके घेतली जातात. यामध्ये विशेष करून ऊस पीक घेण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलेले आहे. या हंगामातील लागवडी सुरुवात झालेली दिसून येत आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातून पिंपळगाव जोगे धरणाचा कालवा गेल्यामुळे या कालव्याच्या जोरावर जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस व आडसाली अशा दोन टप्प्यांत लागवड केली जाते. यामध्ये आडसाली उसाची लागवड ही जून महिन्यात करावी लागते. चालू उसाची लागवड नोव्हेंबर महिन्यात करावी लागते. परंतु जवळपास सर्वच शेतकरी हे आडसाली लागवड करणाऱ्यावर भर देत आहे.

चालू वर्षी शेतकरी स्वतःचे ऊस बियाणांची लागवड करत आहे. यामध्ये चांगल्या दर्जाचे ऊस बेणे निवडीला शेतकरी प्राधान्य देत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकम -८६०३२, फुले२६५, कोएम ८००५या प्रकारच्या सुधारित बियाणे प्रक्रिया करून वापरत आहे. ही लागवड करत असताना सरीमध्ये साडेतीन फूट तर दोन पट्टयामधील अंतर हे साडेचार फूट ठेवले आहे. लागवड करताना मजुरांचे दर देखील वाढलेले आहेत. आता यावर्षी एक एकरची लागवड करायला पाच ते सहा हजार रुपये खर्च येत आहे.

ऊस कारखान्याचे लागवड धोरण जाहीर होताच आडसाली हंगामासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. अधिक उत्पादन देणाऱ्या ‘सुपर केन नर्सरी’ला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कारखान्यांकडून शुद्ध ऊस रोपांचा पुरवठा वाढल्याने रोप लागवड पद्धती स्वीकारली जात आहे. सरळ रेषेत योग्य अंतर राखून लागवड केल्याने फुटव्यांची संख्या नियंत्रित करता येते. यामुळे एकरी १०० टन उत्पादन शक्य होते. शेतकऱ्यांनी घरच्या घरी सुपर केन नर्सरीचा अवलंब करावा.
- विकास चव्हाण, कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते


06501

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com