आळेफाटा सजा पूर्वीप्रमाणे वडगाव आनंदला

आळेफाटा सजा पूर्वीप्रमाणे वडगाव आनंदला

Published on

आळेफाटा, ता. १० : जुन्नर तालुक्यातील महसुली सजा आळेफाटा पूर्वीप्रमाणे वडगाव आनंद तलाठी सजातच राहणार आहे.
आळेफाटा हे गाव वाडी विभाजनापूर्वीपासून वडगाव आनंद याचा गावात समाविष्ट होते व आहे. बऱ्याच अंशी शेतकऱ्यांची शेतजमिनी या तीनही गावात असून, या गावासाठी असणारे तलाठी कार्यालय हे गेली अनेक वर्षे वडगाव आनंद याच ठिकाणी होते. शेतकरी बांधवांना ते सुखकरदेखील आहे. परंतु, कोणतीही आवश्यकता नसताना आळेफाटा हे महसुली गाव चाळकवाडी या नवीन तयार केलेल्या तलाठी सजाला जोडण्यात आले होते. याबाबत ग्रामपंचायत वडगाव आनंद यांना विश्वासात घेऊन अधिसूचना प्रसारित करून नागरिकांच्या हरकती घेणे गरजेचे असताना, ग्रामसभेत विषय चर्चेला येणे अपेक्षित असताना, अधिसूचना तीन वेळा प्रसारित अथवा जारी होणे शासकीय नियमाने बंधनकारक होते. मात्र, असे काहीही झाले नाही.
हे सजा कार्यालय याच ठिकाणी राहावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी तत्कालीन आमदार अतुल बेनके यांच्याकडे केली होती. त्यांनी तहसील कार्यालय जुन्नर, उपविभागीय अधिकारी, मंचर, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालय या सर्व कार्यालयांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाशी सादर करत यावर विभागीय आयुक्त कार्यालयास स्पष्ट अहवाल मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला होता. अखेर त्यास यश आले. तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला. त्या संदर्भाची अधिसूचनेचे पत्र अतुल बेनके यांना देण्यात आले आहे.
वडगाव आनंदच्या सरपंच रेलिका जाधव, उपसरपंच गणेश भुजबळ, ऋषी गडगे, बारकू गडगे, प्रफुल इथापे, संतोष पादीर, संदीप गडगे, गोरख देवकर, सोमनाथ गडगे, तसेच सदस्या वंदना शिंदे, वैशाली देवकर, अल्पना देवकर, कल्पना पादीर, निशा वाळूंज, शोभा शिंदे, अर्चना काशिकेदार, अश्विनी चौगले व सर्व सदस्य व ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा देऊन शासन दरबारी पत्रव्यवहार करून महसुली सजा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com