आळेफाटा बाजारामध्ये कांद्याची आवक घटली
आळेफाटा, ता.३० : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील बाजार समितीत रविवारी (ता.३०) ७१३३ कांदा पिशव्यांची आवक झाली. बाजारात कांद्यास दहा किलोस २२१ रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात कांद्याची आवक घटली आहे.
मोठ्या आकाराच्या एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस मिळाला २२१ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे सांगण्यात आली. सुपर एक नंबर कांद्यास दहा किलोस १९० ते २१०, सुपर मध्यम कांदा दोन नंबर कांद्यास १७० ते १९०, तीन नंबरला १५० ते १७० तसेच चिंगळी कांद्यास दहा किलोस ४० ते ११० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
दरम्यान, येथील बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे. कांद्याचे बाजारभाव स्थिर असल्याची माहिती कांदा व्यापारी रामदास शिंदे, तान्हाजी कुऱ्हाडे, संतोष कुऱ्हाडे, अनिल गडगे, ज्ञानेश्वर गाढवे, शिवप्रसाद गोळवा, विजय कुऱ्हाडे, सचिन डावखर, सागर कुऱ्हाडे, चैतन्य कुऱ्हाडे, शरीफ पटेल, सचिन जाधव, संदीप लोढा, युवराज खोत, संतोष गांधी, भळगट मामा, पापा मोमीण, अरीफ पटेल यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.