पुणे
नवीन कांद्याची आवक ळेफाटा येथे वाढली
आळेफाटा, ता.९ : आळेफाटा (ता.जुन्नर) येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात मंगळवारी (ता.८) ७५२३ कांदा पिशवींची आवक झाली. मोंढयांत कांद्यास दहा किलोस मिळाला २०५ रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली असल्याने बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.
बाजारात मोठ्या आकाराच्या एक नंबर गोळा कांद्यास प्रतिदहा किलोस २०५ रुपये बाजारभाव मिळाला. सुपर एक नंबर कांद्यास दहा किलोस १९० ते २००, सुपर मध्यम दोन नंबरला १७० ते १९०, तीन नंबरला १५० ते १७० तर चिंगळीस ४० ते ११० रुपये बाजार भाव मिळाला आहे.
दरम्यान, येथील बाजार समितीत या आठवड्यात चालू हंगामात कांद्याचे बाजारभाव एका किलोमागे दोन रुपयांनी उतरलेले असल्याची माहीती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.