उच्चशिक्षित औटी दांपत्याकडून ड्रॅगने पाच टन उत्पादन
आळेफाटा, ता.२४ : राजुरी (ता.जुन्नर) या परिसरातून पिंपळगाव कालवा तसेच कुकडी नदी गेल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम बनला आहे. याच पाण्याच्या जोरावर येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. उच्चशिक्षण घेतलेल्या रवींद्र लक्ष्मण औटी व जानकी रवींद्र औटी दांमत्याने ड्रॅगन फ्रूटची या फळाची एक एकरात यशस्वी लागवड केली व पहिल्याच तोड्यात पाच टन मालाचे उत्पादन घेतले.
ड्रॅगन फ्रूटच्या पिकाला वेळोवेळी जैविक औषधी फवारणी केल्यानंतर साधारणपणे १४ महिन्यानंतर या झाडाला फळे आली. फळाला प्रतिकिलोस १३० रुपये बाजारभाव मिळाला होता. आतापर्यंत या झाडांच्या संगोपनासाठी ९ ते १० लाख रुपये खर्च आला आहे. एका झाडाला १० ते १२ फळे लागत असून, एका फळांचे वजन ४०० ग्रॅम भरते व अजून ५ टप माल निघणार असल्याचे रवींद्र औटी यांनी सांगितले.
अशी केली लागवड
१. दहा बाय दहा फुटांच्या अंतरावर बेड पाडले
२. बेडवर शेणखत टाकून ट्रॅक्टरद्वारे मल्चिंग पेपर टाकला
३. सहा फुटाचे सिमेंटचे पोल यामध्ये उभे करून लोखंडाचे चॅनल बसविले
४. सोलापूर, तसेच सांगोला येथून संजीवनी वाणाची ड्रॅग फ्रूट या जातीची ४२०० रोपे लावली
उष्णतेवर संपूर्ण बागेवर ४०० बल्प
ड्रॅगन फ्रट हे पीक जुलै ते ऑक्टोबर हे चार महिनेच चालते. त्यानंतर या फळाला वातावरण गरम लागते यावर चौधरी यांनी संपूर्ण बागेत झाडांवर ४०० बल्ब रात्रीच्या वेळी लावून झाडांना उष्णता दिली. औटी यांना उपसरपंच माऊली शेळके, वल्लभ शेळके, संजू औटी, संजय औटी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
ड्रॅगन फ्रूट हे औषधी फळ म्हणून ओळखले जाते. तसेच या संपूर्ण बागेला रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खते वापरली आहेत .तसेच यासाठी वडील लक्ष्मण आई संजीवनी पत्नी जानकी यांची मोलाची साथ मिळत आहे
- रवींद्र औटी, ड्रॅगन फ्रूट उत्पादक
मागील चार वर्षातील प्रतिकिलोस मिळालेला बाजारभाव
२०२१.......१२० ते १३०
२०२२.......१२०ते १५०
२०२३.......१६० ते १८०
२०२४.......१४० ते १६०
२०२५.......८० ते १३०
06734
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.