बोरी येथे कुकडी डाव्या कालवा फुटण्याचा धोका
आळेफाटा, ता. ८ : कुकडी डाव्या कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटले आहे. त्यामुळे गळतीमुळे पाणी वाया जात आहे. मोठमोठी झाडे झुडपे वाढली आहेत. कालव्यास अस्तरीकरण न केल्यास कालवा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या कालव्याचे त्वरित अस्तरीकरण करावे, अशी मागणी बोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांमधून होत आहे.
जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणाचा असलेला कुकडी डावा कालवा हा पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा कुकडी प्रकल्पातील महत्त्वपूर्ण कालवा आहे. हा कालवा येडगाव, पिंपळवंडी, बोरी, झापवाडी, निघोज, कर्जत करमाळा येथपर्यंत जवळपास २५० किलोमीटर अंतराचा आहे. कालव्याच्या कामास ३० वर्षांहून अधिक वर्षे लोटली आहेत झालेले आहे. या कालव्यातून अतिशय मोठया प्रमाणात १३०० क्युसेक प्रतिसेकंदाला सोडले जात असते. या कालव्याच्या आतून असलेले अस्तरीकरण ठिकठिकाणी निघालेले आहे. कालव्याला आतल्या बाजूस मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. कालव्याची दुरुस्ती सन २००८ मध्ये केली होती. परंतु तेव्हा या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले होते. प्लास्टर केलेले सिमेंट निघून गेले आहे.तसेच कालव्यामध्ये मोठमोठी झाडे झुडपे वाढलेली असल्याने या कालव्याच्या अस्तरीकरणाला भेगा पडलेल्या आहेत.गेल्याच वर्षी उन्हाळ्यात कालव्याला कर्जत करमाळा या ठिकाणी भगदाड पडून हा कालवा फुटला होता. तेव्हा ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊन अनेक शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाऊन नुकसान झाले होते.
कालवा ज्या ठिकाणाहून सुरू झाला आहे त्या ठिकाणापासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे .बोरी बुद्रूक या ठिकाणी तर या कालव्याच्या भिंतीमधून गळती होऊन दर सेकंदाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे.या कालव्याचे प्लास्टर निघाल्याने कालव्याची माती पाण्याने वाहून जाऊ लागली आहे. हा कालवा कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. कालवा फुटून शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कुकडी डावा कालव्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असून गळती झालेले पाणी आमच्या शेतात साचत असल्याने जमीन नापिक झालेली असून, दरवर्षी शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतआहे.पाटबंधारे खात्याकडे कालव्याची होणारी गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरण करावे. लवकरात लवकर या कालव्याची दुरुस्ती करावी. अन्यथा आंदोलन केले जाईल असा कडक इशारा दिला आहे
- शैलेश जाधव, शेतकरी
07147
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.