जुन्नरच्या पूर्व भागात कांदा लागवड अंतिम टप्प्यात

जुन्नरच्या पूर्व भागात कांदा लागवड अंतिम टप्प्यात

Published on

आळेफाटा, ता. १९ ः जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागात या हंगामातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. पुर्व भागातील राजुरी, वडगाव कांदळी, उंचखडक, गुंजाळवाडी, बोरी बुद्रूक, साळवाडी, जाधववाडी, भोरवाडी, वडगाव आनंद, पादीरवाडी, वडगाव कांदळी, कोळवाडी, संतवाडी या गावांमध्ये ही लागवड होत आहे.
मागील हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली होती. परंतु वर्ष झाले तरी कांद्याचा भाव वाढला नाही व साठवून ठेवलेला कांदाही सडला. त्यामुळे शेतकरी वैतागला आहे. तसेच, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची कांदा रोपेही वाया गेली आहेत. याचा फटका आत्ताच्या कांदा लागवडीवर होत आहे. तरीही, चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकरी पुन्हा जोमाने कांदा लागवड करीत आहे. या लागवडीमुळे परिसरातील महिलांना चांगला रोजगार मिळत आहे. मात्र, लागवडीसाठी महिला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्याला एका महिलेला असणाऱ्या ४०० रुपये मजुरीऐवजी ती ५०० रुपयांपर्यंत द्यावी लागत आहे. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com