पुणे
कांदळीत किल्ले बनवा स्पर्धेस प्रतिसाद
आळेफाटा, ता. ३१ : कांदळी (ता. जुन्नर) येथील जय मल्हार गुंजाळ मंडळाच्या वतीने सलग नवव्या वर्षी शाळकरी मुलांसाठी किल्ला बनवा ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये मोठ्या गटात रुद्र सोनवणे व लहान गटात श्लोक गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकास  ट्रॉफी आकर्षक, प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाबाजी घाडगे, संग्राम फुलवडे, नवनाथ गुंजाळ, लक्ष्मण घाडगे, वैभव गुंजाळ आदी उपस्थित होते. डॉ. दीपक घाडगे यांनी स्पर्धेचे परीक्षण, तर वैष्णवी गुंजाळ हिने सूत्रसंचालन केले. वैभव गुंजाळ यांनी आभार मानले.

