आळेफाटा परिसरातील शाळांना सजावट

आळेफाटा परिसरातील शाळांना सजावट

Published on

आळेफाटा : आळेफाटा (ता.जुन्नर) परिसरातील आळे, राजुरी उंचखडक ,जाधववाडी, बोरी बुद्रूक, बोरी खुर्द, साळवाडी, कोळवाडी, संतवाडी, वडगाव आनंद, वडगाव कांदळी या गावांमधील सर्व शाळांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यामध्ये सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच २६ नोव्हेंबर संविधान दिन १९४९ पासून सुरू असून शासन निर्णयानुसार शाळेत सजावट करून रांगोळी काढून विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाचे वाचन करून घेण्यात आले व विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती देण्यात आली. तर संविधान दिनाच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, बोरी बुद्रूक या गावात गावचे उपसरपंच दिनेश जाधव यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गणेश औटी, निवृत्ती कोरडे, ज्ञानेश्वर गायकवाड, उमेश उनवणे, मारुती पवार, दत्ता हलकरे, अशोक कोरडे, जिजाबा कोरडे व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच जाधव यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com