वडगावात कोंबडीसाठी बिबट्यांत तीव्र झुंज

वडगावात कोंबडीसाठी बिबट्यांत तीव्र झुंज

Published on

आळेफाटा, ता. १० : वडगाव आनंद येथे (ता. जुन्नर) सोमवारी (ता.८) रात्री सीताफळ बागेत एकाच वेळी तीन बिबटे आढळून आले. बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती. तिच्यावर दोघांनी झडप टाकली. तिला खाण्यासाठी दोन्ही बिबट्यांमध्ये तीव्र झुंज जुंपली. मात्र, बिबट्यांच्या पंजांच्या प्रहारात कोंबडीचा मृत्यू झाला.

जोरदार भांडणामुळे कोंबडीला खाण्याचा फायदा कोणालाही झाला नाही. यावेळी लांबवर उभा असलेला तिसरा बिबट्या संपूर्ण प्रसंग शांतपणे पाहत होता. हे दृश्‍य सीसीटीव्ही फुटेज कैद झाले आहे. दरम्यान, तीन बिबट्यांच्या वावरामुळे वडगाव परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाने दिल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून बिबट्याचे पाळीव जनावरांवर हल्ले वाढले आहेत. ग्रामस्थांनावरही दोन वेळा हल्ला झाल्याने वनविभागाने देवकर यांच्या शेतात पिंजरा लावला होता. दरम्यान, एकही बिबट्या पिंजऱ्याच्या अगदीजवळ असतानाही त्यात शिरला नाही. पिंजरा उघडा असूनही त्याकडे दुर्लक्ष करून बिबटे सावधपणे आजूबाजूला फिरत असल्याचे दिसले.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, माणसांची हालचाल कळताच तिन्ही बिबटे सावधपणे मागे हटले आणि अंधारात निघून गेले. नागरी वस्ती परिसरात वासरे, मेंढ्या, शेळ्या आणि कोंबड्यांवर एकामागोमाग हल्ले होत असल्याने स्थानिक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. दोन वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये माणसांवरही बिबट्यांनी हल्ला केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ आणि कठोर उपाययोजनांची मागणी वनविभागाकडे केली आहे.


07427

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com