साळवाडी येथे प्रथमच ब्रम्हा सागाच्या रोपांची लागवड

साळवाडी येथे प्रथमच ब्रम्हा सागाच्या रोपांची लागवड

Published on

आळेफाटा, ता. ८ ः साळवाडी (ता. जुन्नर) येथील संपत चिंचवडे व सारीका चिंचवडे या शेतकरी जोडीने ब्रम्हा जातीच्या सागाची सुमारे चारशे रोपे दीड एकर क्षेत्रावर लावली आहेत. पुणे जिल्ह्यात या जातीच्या सागाची प्रथमच लागवड करण्यात आली आहे.
लाकडांचा राजा म्हणून सागाला ओळखले जात असून, या झाडाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. अत्यंत टिकाऊ म्हणून याची ओळख असून, सागाच्या देशी सागवान, मलेशियन सागवान, मलबारी सागवान, टिशू कल्चर ब्रम्हा सागवान या जाती आहेत. विशेष करून या सर्वांची लागवड हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. यामध्ये ब्रम्हा या जातीचा साग हा आठ ते १० वर्षातच काढायला येतो.
दोन वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या वतीने जळगाव या ठिकाणी गेलेल्या अभ्यास दौऱ्यात या सागाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा अभ्यास केल्यानंतर संपत व सारीका यांनी स्वतःच्या शेतात लागवड करण्याचे ठरवले. त्यानुसार सुरुवातीला यासाठी दीड एकर क्षेत्राची निवड करून चार ते पाच ट्रॉली शेणखत पांगवले व आठ बाय आठचे अंतर ठेवून ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेड पाडले. त्यानंतर जबलपूर या ठिकाणाहून ४५ हजार रुपयांची ४०० टिश्यू कल्चर ब्रम्हा या जातीची रोपे आणून चार ते पाच फुटांचे अंतर ठेवून लावली. या लावलेल्या झाडांना कुठल्याही प्रकारची औषधे फवारणी करावी लागत नसून, यामध्ये तीन वर्षे कुठलेही आंतरपीक घेता येते. त्यामुळे याला खर्च फक्त रोपांचाच आहे.
या झाडाची उंची १० वर्षात ही ४० ते ५० फुटापर्यंत जाते व एका झाडापासून १० ते १२ घनफूट लाकूड मिळते. त्यांचा उपयोग जहाज बांधणी, रेल्वे विभागात, खेळणी, फर्निचरसाठी केला जातो.

सागाची रोपे लावण्यास शासनाने परवानगी दिलेली असून, याला शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सध्या सागाला २ ते ३ हजार रुपये घनफूट बाजार भाव चालू असून, एका झाडापासून २० ते २५ हजार रुपये आठ ते १० वर्षात मिळणार आहेत.
- संपत चिंचवडे, उच्चशिक्षित शेतकरी

दोन वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यात अभ्यास दौरा केला असता त्या ठिकाणी ब्रम्हा या जातीच्या सागवान झाडांची माहिती घेऊन अभ्यास केला. त्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये सागाच्या रोपांची लागवड केली असून, या रोपांची उंची आज जवळपास १४ ते १५ फुटांपर्यंत झाली आहे. तसेच, यासाठी कृषी अधिकारी राजश्री नरवडे, सुजाता खेडकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
- सारीका चिंचवडे

07506

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com