आळे येथे विद्यार्थ्यांकडून श्रमदानासह सामाजिक प्रबोधन
आळेफाटा, ता.१२ : आळे (ता.जुन्नर) येथे बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मंगळवार (ता.६) ते सोमवार (ता.१२) दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर तर येथील कोळवाडीत श्रमदानाबरोबरच सामाजिक प्रबोधन केले. शिबिरात १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
पहिल्याच दिवशी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिर परिसर कचरा मुक्त केला. दुसऱ्या दिवशी कोळवाडी गावातील प्राथमिक शाळा परिसर आणि स्मशानभूमी येथे सफाई अभियान राबवून स्मशानभूमीसाठी प्रदक्षिणामार्ग तयार केला. तसेच कानिफनाथ गडावरील मंदिर परिसराची स्वच्छता करून तेथील प्लॅस्टिक कचरा संकलित केला.
दरम्यान, आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने डॉ. समीक्षा लाड व डॉ. विशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंदा साबळे व त्यांच्या पथकातर्फे किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली.
शिबिराच्या समारोपप्रसंगी ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे, संतवाडीचे सरपंच नवनाथ निमसे, मारुती पाडेकर, उल्हास सहाणे, सौरभ डोके, डॉ. अर्जुन पाडेकर, अरुण हुलवळे, प्रदीप गुंजाळ, किशोर कुऱ्हाडे, बबनराव सहाणे, जीवन शिंदे, शिवाजी गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन कार्यक्रमाधिकारी डॉ.जयसिंग गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अरविंद कुटे यांनी केले तर आभार प्रा. विकास पुंडे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा. सोनाली घोडेकर, प्रा.योगेश पाडेकर, प्रा. तेजल गायकवाड, प्रा.साक्षी शिंदे, प्रा. संजय वाकचौरे यांनी विशेष मेहनत घेतली.
07605

