आईच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना सायकल वाटप

आईच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना सायकल वाटप

Published on

आळेफाटा, ता. ५ : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि आळे गावचे माजी सरपंच प्रीतम काळे, प्रवीण काळे, प्रसाद काळे यांनी त्यांच्या मातोश्री यमुना नंदकुमार काळे यांच्या स्मरणार्थ आळे (ता. जुन्नर) गावातील ६४ गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप केली. तसेच गावातील सर्व मंदिरांना समई‌ दिली. अंगणवाडी सेविका, मदतनिसांना साडी वाटप, अन्नपूर्णासाठी देणगी, भजनी मंडळासाठी साहित्य वाटप करण्यात आले.
सायकलींचे वाटप समाधान महाराज शर्मा, माजी आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे, भास्कर गाडगे, नेताजी डोके, सारंग घोलप, प्रसन्न डोके, अजय कुऱ्हाडे, जिवन शिंदे, बाजीराव लाड, ॲड. विजय कुऱ्हाडे यांच्या हस्ते देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com