सह्याद्री व्हॅली कॉलेजमध्ये परिसंवाद स्पर्धा उत्साहात
आळेफाटा, ता. १४ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत राजुरी (ता. जुन्नर) येथील महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित दोन दिवसीय विद्यार्थी सहभाग परिसंवाद स्पर्धा उत्साहात झाली. या कार्यक्रमाचे परीक्षण जीएमआरटीचे अधिकारी हनुमंतराव भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण, शैक्षणिक अधिष्ठाता पी. बालरामुडू आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शाश्वत विकास, महिला सुरक्षा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि माझ्या करिअरची ब्ल्यू प्रिंट अशा विविध विषयांवर आपले विचार मांडले.
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी ६ जणांच्या गटात या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तसेच विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार रुपयांची रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. संस्थेचे खजिनदार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. रांधवत भागवत, विशाल औटी, कविता खटाळ, कविता खेमनर, दिव्या रहाणे, वैभव नांगरे, तेजस नलावडे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

