तीन किमीसाठी तासाभराचा वेळ
आळेफाटा, ता. १६ : बोरी खुर्द ते शिरोली या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे प्रवाशांना हा प्रवास करण्यासाठी तब्बल एक तास लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत असल्याने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून काही शेतकऱ्यांनी पाइपलाइनसाठी रस्ता खोदल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. रस्ता अरुंद असल्याने आणि दोन्ही बाजूंना झाडेझुडपे वाढल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने जड वाहनांची वर्दळ वाढली आहे, परिणामी वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.
7776
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

