पंगतीतील पत्रावळीवर थर्माकोलचे वर्चस्व
आळेफाटा, ता. २३ : सध्या विविध कार्यक्रमांमध्ये जेवणासाठी पानांच्या पत्रावळीऐवजी प्लास्टिक, थर्माकोलचा सर्सास वापर केला जात आहे. शासनाने बंदी करूनही थर्माकोलच्या पत्रावळ्या ग्रामीण भागात आजही वापरल्या जात आहेत.
पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या व द्रोण कालबाह्य झाले आहेत. पूर्वी लग्नात, घरगुती कार्यक्रमात सामूहिक जेवणाच्या पंगतीला पळसाच्या झाडांच्या पानांच्या पत्रावळ्यांचा वापर केला जायचा. या पत्रावळ्यांमुळे उपजीविकेचे साधन निर्माण झाले होते. परंतु आता या पत्रावळ्यांना मागणी कमी झाल्याने उपजीविकेचे साधनही राहिले नाही. अनेक कुटुंबे या व्यवसायापासून दूर गेले आहेत.
अशी तयार व्हायची पानांची पत्रावळी
झाडांच्या पानांच्या पत्रावळी ऐवजी आता सर्वत्र प्लास्टिक तसेच थर्माकोलच्या पत्रावळ्या,प्लास्टिकचे ग्लास यांचा वापर केला जात आहे. प्लास्टिक तसेच थर्माकोल हे मानवी आरोग्यास घातक असूनही त्यांचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे चित्र सध्या सर्व कार्यक्रमात दिसत आहे. लग्न, साखरपुडा, घराची पूजा, जागरण गोंधळ, गणपती उत्सव तसेच नवरात्र उत्सवात ही जेवणाला प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रवळ्यांचा वापर होत आहे.
अशी बनवली जायची पळसाच्या पानांची पत्रावळी
पळसाच्या पानांना सुतळी द्वारे गुंफले जात असे. पानांचे देठ कापून पाने एकावर एक एक रचून ठेवले जातात. ही पाने एकमेकांना टाचण्यासाठी पानांचा देठांचा वापर केला जातो. साधारण एक पत्रावळी बनवण्यासाठी सात ते आठ पाने वापरली जातात. ही पत्रावळी काहीशी ओबडधोबड आकारात तयार होते. त्यांना नंतर कात्रीने कापून गोल आकार दिला जातो. या पत्रावळीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सोपे होते. हा कचरा जाळून टाकणे सोईस्कर आहे. त्यातून शेताला खतही मिळण्यास मदत होते. परंतु बदलत्या परिस्थितीने पानांच्या पत्रावळीची जागा थमॉकोलच्या पत्रावळीने घेतली आहे.
प्लास्टिकच्या पत्रावळ्या वापरून झाल्यानंतर त्याचे विघटन लवकर होत नाही. या पत्रावळ्या जनावरांनी खाल्ल्यास जनावरे दगावण्याची शक्यता जास्त असते. या पत्रावळ्यांनी जैविक सृष्टीवर प्रदूषणाचा घातक परिणाम होतो. त्यामुळे या पत्रावळ्या मानवी आरोग्यास हानिकारक आहे.
- डॉ. सागर ताजवे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

