आळे येथे विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम
आळेफाटा, ता. १७ : आळे (ता. जुन्नर) येथील श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिर परिसरात मंगळवारी (ता. १७) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युथ फॉर माय भारत, युथ फॉर डिजिटल लिटरसी’, या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रसन्न डोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रमदानाचे कौतुक करत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा ट्रॉफी व पुष्प देऊन सन्मान केला.
यावेळी शिबिरार्थींनी योगा, प्राणायाम, प्रार्थना, ग्रामस्वच्छता, नेत्र तपासणी, वृक्षारोपण केले. तसेच, स्मशानभूमी, दशक्रिया विधीघाट, ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसर, ग्रामपंचायत कोळवाडी परिसर, गावातील रस्ते, नारायण गड संवर्धन गड स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांनी पार पाडत श्रमदान केले.
महिला सुरक्षा व व्यसनमुक्ती या विषयावर विद्यार्थ्यांनी पथ नाट्यातून सामाजिक प्रबोधन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. उद्धव भारती यांनी शिबिर कामकाज अहवाल वाचन केले, तर सूत्रसंचालन कविता खेमनार यांनी केले. वैभव नांगरे यांनी आभार मानले.
शिबिराच्या समारोप प्रसंगी आळे गावचे सरपंच सखाराम भंडलकर, कोळवाडीचे सरपंच ललिता पारवे, संतवाडीचे सरपंच नवनाथ निमसे, संस्थेचे अध्यक्ष व्हि. दिवाकरण, उपाध्यक्ष किशोर पटेल, सचिव गणपत कोरडे, खजिनदार सचिन चव्हाण, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे, देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक कान्हू कुऱ्हाडे, प्राचार्य डॉ. संजय झोपे, उपप्राचार्य पी. बालारामडू आदी उपस्थित होते.
07778
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

