आळेफाटा येथे कांदा
१८१ रुपये १० किलो

आळेफाटा येथे कांदा १८१ रुपये १० किलो

Published on

आळेफाटा, ता. १८ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजारात मंगळवारी (ता. १७) १८ हजार ६४० कांदा पिशव्यांची विक्रमी आवक होऊन प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास दहा किलोस १८१ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे व माजी उपसभापती प्रीतम काळे, कार्यालय व्यवस्थापक सतीश म्हस्करे यांनी दिली.
आळेफाटा येथे मंगळवारी झालेल्या मोढ्यांत १८ हजार ६४० कांदा पिशव्यांची आवक होऊन एक नंबर नवीन कांद्यास १७० ते १८१ रूपये, एक नंबर सुपर कांद्यास १५० ते १७० रुपये, दोन नंबर कांद्यास १३० ते १५० रूपये, तीन नंबर गोल्टी कांंद्यास ११० ते १३० रुपये व बदला कांद्यास ३० ते ९० बाजारभाव मिळाला.
कांद्याच्या बाजारभावात प्रतिकिलोला एक ते दोन रुपयांनी वाढ झालेली असून, सध्या बाजारात नवीन कांदा काढणी जोरात चालू आहे. तो बाजारात विक्रीसाठी येत असल्याने आवक दिवसेंदिवस वाढत आहे, असे कांदा व्यापारी व्यापारी रामदास शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com