आळेफाटा येथे कांदा १५० रुपये १० किलो

आळेफाटा येथे कांदा १५० रुपये १० किलो

Published on

आळेफाटा, ता.२१ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील शुक्रवारी झालेल्या मोढयांत एक नंबर कांद्यास दहा किलोस १३० ते १५० बाजारभाव मिळाला‌‌.
बाजारात दहा किलोच्या दोन नंबर कांद्यास ११० ते १३०, तीन नंबरला ९० ते ११०, चिंगळीला ३० ते ९० रुपये बाजारभाव मिळाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी अतोनात कष्ट करूनही कांद्याला योग्य असा बाजारभाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे. कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सध्या कांद्याला किलोला फक्त १३ ते १५ रुपये भाव मिळत आहे परंतु वातावरणात नेहमी होणारे बदल यामुळे वेळोवेळी करावी लागत असलेली औषधे फवारणी,खतांचे वाढलेल्या किंमती यासाठी मोठा खर्च येत असून सध्या मिळत असलेल्या भावात खर्च देखील फिटत नाही.
कांदा उत्पादन करण्यासाठी खर्च वाढलेले आहे.खते, औषधे यांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असून लागवडीपासुन काढणीपर्यंत मोठा खर्च येत असून यामध्ये औषधे ,खते, मजुराचे दर देखील वाढलेले आहेत तसेच कांदा निर्यात थांबविल्यामुळे कांद्याचे दर कोसळले असल्याने शासनाने निर्यातबंदी उठवत कांदा उत्पादकाला रास्त भाव देण्यात यावा नाहीतर कांद्यालादेखील खर्चाच्या प्रमाणात हमीभाव द्यावा, अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com