जुन्नरच्या पूर्व भागात मल्चिंग पेपरचा वापर

जुन्नरच्या पूर्व भागात मल्चिंग पेपरचा वापर

Published on

आळेफाटा, ता.२३ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात शेतकरी पिकांना पाणी देताना मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर करीत आहेत.
तालुक्यातील राजुरी, वडगाव आनंद, आळे, आळेफाटा, लवणवाडी, बोरी बुद्रूक, कोळवाडी, साळवाडी, जाधववाडी, वडगाव कांदळी, संतवाडी आदी गावामध्ये प्रगतशील शेतकरी आहेत. सध्या उन्हामुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी कमी पाण्यामध्ये पिके कशी घेता येतील, यासाठी प्रयत्नशील आहेत.
शेतकऱ्यांचा मिरची, टोमॅटो, वांगी, काकडी आदी पिकांसाठी मल्चिंग पेपरच्या वापराकडे कल वाढला आहे. यामुळे पाण्याचीही बचत होऊन पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळतआहे, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले.


07801

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com