बोरी बुद्रुकमध्ये कुटुंबाला
कोयता दाखवून लुटले

बोरी बुद्रुकमध्ये कुटुंबाला कोयता दाखवून लुटले

Published on

आळेफाटा, ता. २२ : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील कोरडे मळ्यात राजेंद्र कोरडे यांना कोयत्याचा धाक दाखवत १५ तोळे सोन्याचे व १० तोळे चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (ता. २१) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
बोरी बुद्रुक येथील कोरडे मळ्यात राहात असलेले राजेंद्र सीताराम कोरडे हे पत्नी हिरा, मुलगा नितीन, सून धनश्री व मुलगी दीपाली यांच्यासमवेत शेतात असलेल्या घरात रहात होते. ते नेहमीप्रमाणे शनिवार रात्री जेवण करून झोपले. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाज्यावर मोठा दगड टाकून दरवाजा तोडत आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले. त्यावेळी समोर चोर दिसल्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे चोरट्यांनी राजेंद्र कोरडे यांच्या हातावर काठीने मारले व कोयत्याचा धाक दाखवून सर्वांना दमदाटी केली. तसेच, ‘दागिने व पैसे कुठे ठेवले ते सांगा, नाहीतर तुम्हा सर्वांना मारहाण करण्यात येईल,’ असे ते म्हणत घरातील सर्वांना एका खोलीत नेऊन बसवले. दरम्यान चोरट्यांनी कपाटाचे लॉकर तोडत आतमध्ये असलेले १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच १० तोळे चांदीचे दागिने चोरून नेले.
दरम्यान, घटनास्थळी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस पाटील विघ्नेश जाधव यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार हे करत आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राजुरी या ठिकाणी गावठाणात रहात असलेले दिलीप गंधट यांच्या बंद घराचे कुलूप दुपारी तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. त्यावेळी बाजुला रहात असलेल्या शेजाऱ्यांना काय आवाज येत आहे, ते पाहण्यासाठी बाहेर आल्याने आले असता चोरट्यांनी या ठिकाणाहून पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com