कांद्याच्या भावामध्ये आळेफाटा येथे घट
आळेफाटा, ता.२४ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (ता.२४) २० हजार ८२७ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास दहा किलोस १५१ रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याच्या बाजारभावात किलो मागे २ ते ३ रुपयांनी घट झाली आहे.
बाजारात एक नंबर सुपर कांद्यास १३० ते १४०, दोन नंबरला ११० ते १३०, तीन नंबर गोल्टीस ९० ते ११० तर बदला कांद्यास ३० ते ९० बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती संजय काळे व माजी उपसभापती प्रीतम काळे,कार्यालय व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी दिली.
दरम्यान, सध्या बाजारात नवीन कांदा काढणी जोरात चालु असल्याने निघालेला कांदा बाजारात विक्री येत असल्याने मार्केट मध्ये कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे, असे कांदा व्यापारी व्यापारी रामदास शिंदे, तान्हाजी कुऱ्हाडे, संतोष गांधी, भळगट मामा, पापा मोमीण, अरीफ पटेल यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

