हार्वेस्टरने गहू पिकाची आळेफाटा येथे काढणी

हार्वेस्टरने गहू पिकाची आळेफाटा येथे काढणी

Published on

आळेफाटा, ता.२८ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा परिसरात गहू काढणीच्या कामाला वेग आला आहे. सध्या शेतकरी हार्वेस्टर यंत्राद्वारे गहू कापताना दिसत आहे. पैसा आणि वेळेची बचत होत असल्याने शेतकरी हार्वेस्टरला प्राधान्य देत आहेत.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामधील आळेफाटा, राजुरी, आळे, वडगाव आंनद, गुंजाळवाडी, उंचखडक, बोरी बूद्रूक, जाधववाडी, साळवाडी आदी गावांत सध्या गहू काढणीला वेग आला आहे. जवळपास सर्वच शेतकरी हार्वेस्टरने गहू करताना दिसत आहेत. गहू कापायला मजूर मिळत नाहीत. मजुरीचे दरही वाढले आहेत. मजुरांना एक एकरसाठी सुमारे पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो तर हार्वेस्टर यंत्राला सुमारे चार हजार रुपये खर्च येतो. त्यातच हवामान खात्याने या आठवड्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून गहू कापणीची कामे उरकून घेण्याचा कल वाढला आहे.

07822

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com