उंचखडक, राजुरीच्या यात्रोत्सवात धावले ३२४ बैलगाडे

उंचखडक, राजुरीच्या यात्रोत्सवात धावले ३२४ बैलगाडे

Published on

आळेफाटा, ता. ६ : उंचखडक, राजुरी (ता. जुन्नर) येथील भैरवनाथाच्या यात्रोत्सवानिमित्ताने बैलगाड्यांच्या शर्यती पार पडल्या. या स्पर्धेत पुणे, ठाणे, अहिल्यानगर, नाशिक, पाथर्डी, संगमनेर तसेच सातारा जिल्ह्यातील ३२४ बैलगाडे धावले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी क्रमांकाची फळीफोड कै‌. नारायण गबाजी जरे यांच्या बैलगाड्याने फोडली. तर दुसऱ्या दिवशी फळीफोड पप्पूदादा मित्र मंडळ आणि असिफभाई मुबारक मुलाणी यांच्या बैलगाड्याने फोडली.
फायनलमध्ये दोन दिवसांमध्ये पहिल्या दिवशी पप्पूदादा मित्र मंडळ आसिफ भाई मुलाणी आणि नीलेश अप्पासाहेब वाळुंज यांचा बैलगाडा आला. तर‌ दुसऱ्या दिवशी गौरव सुरेश औटी, पाटील बुवा बाळाजी दाभाडे गबाजी मारूती पानसरे यांचा नंबर आला. तसेच द्वितीय क्रमांकात पहिल्या दिवशी गोविंद ज्ञानेश्‍वर खिल्लारी, फक्कड मारुती शिंदे, आदित्य रमेश ढोबळे, श्रीराम मित्र मंडळाचा बैलगाडा आला. तर दुसऱ्या दिवशी अजित बाबजी काळे व पवनराजे सुर्वे तसेच कल्पेश बाळू गुंजाळ यांचा नंबर आला.
तिसऱ्या क्रमांकात पहिल्या दिवशी बाबाजी भिकाजी गाडगे, विशाल खटाटे आणि कै.बबनराव रामभाऊ पवार, दीपक निवृत्ती कणसे यांचा बैलगाडा आला. दुसऱ्या दिवशी स्मिता पंकज कणसे, पांडुरंग किसनराव काळे, मानका देवी मित्र मंडळ, धनंजय दादाभाऊ लांडे यांचा बैलगाड्यांचा नंबर आला. घाटाचा राजा पहिल्या दिवशी किशोर दांगट, यांचा बैलगाडा तर दुसऱ्या दिवशी पप्पू दादा मित्र मंडळ, आसिफ भाई मुबारक मुलाणी यांचा बैलगाडा ठरला. आकर्षक बारी पहिल्या दिवशी ए. के. कॅटल उद्योग समूह खडकवाडी यांचा बैलगाडा आणि दुसऱ्या दिवशी कुमार सुरेश कणसे, साईश्रद्धा डोंगरे यांचा बैलगाडा आला आहे.
तसेच या ठिकाणी प्रथम क्रमांकात ४९, तर द्वितीय क्रमांकात १५५, तृतीय क्रमांकात ७२, चतुर्थ क्रमांकात ४८ असे एकूण ३२४ बैलगाडे बक्षीस पात्र ठरले.
प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार, तृतीय क्रमांकास ५० हजार, चतुर्थ क्रमांकास २५ हजारांचे बक्षीस तर फळीफोड गाड्यांसाठी तीन दिवसांसाठी ८४ हजार देण्यात आले. घाटाचा राजासाठी एक नंबर फायनलसाठी दररोज ११ हजार ट्राॅफी तर फायनल साठी दररोज एक मोटार सायकल देण्यात आली. घाटाचा महाराजा स्मिता पंकज कणसे यांच्या बैलगाड्याचा नंबर आला. त्यांना ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
या यात्रोत्सवाला पुणे जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, गाडा शौकीन उपस्थित होते. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार सर्व संचालक मंडळ, यात्रोत्सव कमिटी, नवरात्रोत्सव कमिटी सभासद ग्रामस्थांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com