ट्रेकर्ससाठी ‘दुर्ग’चा डिजिटल आधार
आळेफाटा, ता. ८ ः आळेफाटा (ता. जुन्नर) येथील श्रद्धेय सुनील गाडेकर (वय २२) याने प्रमोद पुडाळे आणि सागर यादव आपल्या दोन इंजिनिअर मित्रांच्या मदतीने ‘दुर्ग’ हे भारतातील पहिले भारतीय ऑफलाईइन नेव्हिगेशन ट्रेकिंग ॲप तयार केले आहे. हे ॲप गड किल्ले चढण्यासाठी मार्ग आणि वाटा दाखवते.
सध्या सह्याद्रीत ट्रेकिंग करताना अपघातांची संख्या वाढत आहे. विशेषतः हरवणे आणि वाट चुकण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. अशा परिस्थितीत दुर्ग ॲप ट्रेकर्ससाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. भारतातील पहिल्या आणि एकमेव ऑफलाइन ट्रेकिंग नेव्हिगेशन ॲपमधून १६० हून अधिक गड- किल्ल्यांचे, धबधब्यांचे आणि गुहांचे नकाशे उपलब्ध आहेत.
इंटरनेटशिवायही हे ॲप अचूक मार्गदर्शन करते. त्यामुळे हरवण्याचा धोका कमी होतो. ट्रेकिंगला सुरक्षित आणि सुकर बनवण्यासाठी दुर्ग ॲप सध्या काळाची गरज बनले आहे. श्रद्धेय गाडेकर हा सध्या बीएससी ऍग्री करत असून, लहानपणापासून त्याला गड किल्ले सर करण्याची व ट्रेकिंग करण्याची आवड आहे. ट्रेकिंग करताना त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्याने ट्रेकर्सला मदत होणारे ॲप करण्याचे ठरवले. इयत्ता बारावीपासून तो हे ॲप बनवण्याचे प्रयत्न करत होता. श्रद्धेय गाडेकरच्या या यशाचे जुन्नर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
दुर्ग ॲपची वैशिष्ट्ये
२००+ ट्रेक रूट्स- महाराष्ट्रातील २०० पेक्षा जास्त किल्ले, धबधबे आणि गुहांचे नेव्हिगेशन
ऑफलाइन नेव्हिगेशन- ट्रेक सुरू करण्याआधी नेव्हिगेशन मॅप डाऊनलोड करून तुम्ही इंटरनेटशिवाय ट्रेक करू शकता
सोपे व नेमके मार्गदर्शन- ॲपच्या नेव्हिगेशन फीचर्समुळे तुम्हाला सुरुवातीच्या ठिकाणापासून ट्रेकच्या टोकापर्यंत सहज पोहोचता येते
विश्वासार्ह आणि अचूक- ट्रेकिंगसाठी खास तयार करण्यात आलेले नेव्हिगेशन तुम्हाला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून वाचवते
उत्तम रेटिंग आणि लोकप्रियता- गुगल प्ले स्टोअरवर ४ स्टार रेटिंगसह ॲपचे ४५०००+ डाऊनलोड्स आहेत.
किल्ले प्रेमी आणि ट्रेकर्ससाठी उपयोगः
ट्रेकिंगच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन
सह्याद्रीच्या दुर्गम भागांमध्ये सुद्धा नेव्हिगेशन मदत उपलब्ध
ट्रेकिंगच्या उत्साहींसाठी एकमेव संपूर्ण ट्रेकिंग सोल्यूशन
07857
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

