आळेफाटा बाजारात ३४८ गाईंची विक्री

आळेफाटा बाजारात ३४८ गाईंची विक्री
Published on

आळेफाटा, ता. १२ : आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १२) झालेल्या गाईंच्या बाजारात ३४८ गाईंची विक्री झाली.
आळेफाटा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाई बाजार हा जिल्ह्यात सर्वांत मोठा बाजार भरत असतो. येथे पुणे, नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, शिरूर, आंबेगाव, ठाणे तसेच इतर ठिकाणांहून संकरित दुधाळ जातीच्या गाया विक्रीसाठी येत असतात. या आठवड्यात भरलेल्या बाजारात ३६५ संकरित गाया विक्रीसाठी आल्या होत्या. यामध्ये पाच हजारांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत गाई विकल्या गेल्या, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी उपसभापती प्रीतम काळे, सचीव रूपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख सतीश म्हस्करे यांनी दिली.
दरम्यान, सध्या कडक असा उन्हाळा सुरू हिरव्या चाऱ्याचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे दुधाचे भाव कमी होत चालले असून दुसरीकडे सुग्रासचे बाजारभाव वाढतच चालले आहेत, अशी माहिती ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, संतोष कुऱ्हाडे, रोहिदास निमसे आदींनी व्यक्त केली आहे.


07889

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com