कांदा चाळीत साठवणुकीकडे जुन्नरमधील शेतकऱ्यांचा कल

कांदा चाळीत साठवणुकीकडे जुन्नरमधील शेतकऱ्यांचा कल

Published on

आळेफाटा, ता.१६ : उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला प्रति किलो केवळ सहा ते १३ रुपये बाजारभाव मिळत असल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खर्चही वसूल होत नसल्याने आळेसह जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता विक्रीऐवजी कांदा चाळीत साठवून ठेवण्याकडे कल वाढवला आहे.
जुन्नर तालुक्यातील येडगाव, वडज, पिंपळगाव जोगे, माणिकडोह आणि चिल्हेवाडी धरण क्षेत्रात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा एप्रिल-मे महिन्यात काढणी झालेल्या कांद्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली. प्रतिकिलो १३ रुपये उत्पादन खर्च येत असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी बाजारभाव मिळत आहे. वाढलेले इंधन दर, खते आणि मजुरीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे.
मजुरांच्या कमतरतेमुळे कांदा काढणीचा एकरी खर्च १६ ते १९ हजार रुपयांवर पोहोचला आहे. ३०० रुपयांची मजुरी ६०० रुपयांवर गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे उत्पादनात घट झाली असून, हवामान बदलामुळे साठवलेला कांदा टिकण्याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. शासनाने हमीभावाने कांदा खरेदी करून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे, पण बाजारभाव मात्र मातीमोल मिळत आहेत. शासनाने उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊन कांदा खरेदी करावा.
- एकनाथ पाडेकर, शेतकरी

07909

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com